आताचे लॉकडाऊन कसे असायला हवे ?

आताचे लॉकडाऊन कसे असायला हवे ?

महाराष्ट्रात आता लॉकडाऊन होणार हे निश्चित झाले आहे. फक्त कधीपासून आणि त्यात काय सुरु असणार? हे जाहीर होणे बाकी आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सने १४ दिवसांचे लॉकडाऊन करण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री आज इतर घटकांशी लॉकडाऊनवर चर्चा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च २०२० रोजी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. मात्र, त्याआधी देशातली किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लॉकडाऊन घोषित केला होता. सरकारी माहितीनुसार तब्बल ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या राज्यातल्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन लागू केला होता.

मागच्या लॉकडाऊन व आताचा लॉकडाऊनमध्ये महत्वाचा फरक आहे. त्यावेळी आपल्याकडे पायाभूत सुविधा नव्हत्या. परंतु आता त्या निर्माण झाल्या आहेत. फक्त लोक ऐकत नाही, विनाकरण फिरत असल्याने कोरोना रुग्ण वाढत आहे. यामुळे लॉकडाऊनची गरज आली आहे. आता आपल्याकडे मागील लॉकडाऊनचा अनुभव हाती आहे. आता लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, जेणेकरून आधीसारखा गोंधळ होणार नाही, लोकांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याचा हा आढावा...

Title Name
Video : लॉकडाऊन निषेधार्थ उदयनराजेंचं ‘भीक मागो' आंदोलन
आताचे लॉकडाऊन कसे असायला हवे ?

प्रवास सुरु राहणार का?

मागलवर्षीच्या लॉकडाउनमध्ये आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे लाखो मजूर हजोर किलोमीटरचा पायी प्रवास करुन गावी पोहचत होते. त्यात कित्येक जणांचा मृत्यू झाला. मागील लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद होती. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत प्रवासाचे निर्बंध नसतील, असे केंद्राने मागील आठवड्यात जाहीर केले आहे. जिल्हाबंदी नसेल, राज्या राज्यांमधली प्रवासी वाहतूकही सुरू राहील, हे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही, पण निर्बंध असतील. दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी किंवा मालाची वाहतूक करण्यासाठी कोणते परमीट किंवा परवानगीची गरज नसेल.

उद्योगाचे काय होणार

गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सर्व उद्योगधंदे ठप्प झाले. परिणामी तेथील कामगारही आपापल्या घरी परतू लागले. महाराष्ट्रात जेव्हा 'मिशन बिगन अगेन'अंतर्गत उद्योगधंदे नियमांचं पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली, तेव्हा कामगारांची कमतरता भासू लागली. कारण लॉकडाऊनमुळे कामगारवर्ग गावाकडे निघून गेला होता. म्हणजेच आधीच्या लॉकडाऊनमधून सर्वात मोठी गोष्ट काय शिकायची असेल, तर रोजगाराला धक्का लागायला नको, ही आहे.

लोकांच्या खात्यात पैसा हवा

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसतो, हे गेल्या वर्षभरात लक्षात आले. मग यावेळी काय गोष्टी टाळता येतील, करता येतील, जेणेकरून अर्थव्यवस्थेचे चक्र किमान पातळीवरून नेहमीसारखे सुरू राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची क्रयशक्ती संपता कामाना नये. मागणी कमी झाल्यास पुरवठा कमी होतो आणि मग अर्थचक्र बिघडते. त्यामुळे लोकांच्या हातात पैसा दिला पाहिजे. अमेरिकेने गरीब-श्रीमंत न पाहता, थेट पैसे खात्यात जमा केले. तसे आपल्या सरकारने केले पाहिजे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com