भारतीय मातीच्या शक्तीची जगाला नवी ओळख

सद्गुरूंच्या ‘माती वाचवा’ चळवळीबद्दल पंतप्रधानांचे गौरवोद्गार
भारतीय मातीच्या शक्तीची जगाला नवी ओळख

नवी दिल्ली । प्रतिनिधी New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू (Sadguru, the founder of Isha Foundation)यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या 'माती वाचवा' चळवळीचे ( Save Soil Campaign ) कौतुक केले. सद्गुरूंच्या प्रवासामुळे जगाला मातीबद्दल आपुलकी निर्माण झाली असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जगाने भारतीय मातीची ताकदही पाहिली असेल, असे उद्गारही पंतप्रधान मोदी यांनी काढले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान आणि सद्गुरू यांनी नेते, राजकारणी आणि प्रभावशाली श्रोत्यांना संबोधित केले. माती नामशेष होण्याचा गंभीर मुद्दा आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी धोरणात्मक कार्यवाहीची आवश्यकता सर्वांसमोर आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

'माती वाचवा' मोहिमेला पंतप्रधानांनी मनापासून पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. या मोहिमेने मानवतेची मोठी सेवा केल्याचे सांगून पंतप्रधान सद्गुरूंच्या कठीण मोटारसायकल प्रवासाविषयी बोलले. या प्रवासामुळे जगाला मातीबद्दल आपुलकी निर्माण झालीअसेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जगाने भारतीय मातीची ताकदही पाहिली असेल, असेही उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

कार्यक्रमानंतर सद्गुरूंनी सेव्ह सॉईल पॉलिसी हँडबुकही पंतप्रधानांना सादर केले. या हँडबुकमध्ये व्यावहारिक, वैज्ञानिक उपाय देण्यात आले आहेत. त्याचा उपयोग करून सरकार आपल्या देशातील माती पुनरुज्जीवित करण्यासाठी कृती करू शकते. सद्गुरूंनी 27 देशांतील मातीसाठी 100 दिवसांच्या एकट्याने केलेल्या मोटरसायकल प्रवासाचा आजचा 75 वा दिवस आहे. आजपर्यंत ही चळवळ 2.5 अब्ज लोकांपर्यंत पोहोचली आहे. 74 देशांनी त्यांच्या राष्ट्रांची माती वाचवण्यासाठी कृती करण्याचे मान्य केले आहे. भारतातील 15 लाखांहून अधिक मुलांनी पंतप्रधानांना पत्र लिहून देशाची माती आणि त्यांचे सामूहिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी कृती करण्याची विनंती केली आहे.

नागरिकांच्या पाठिंब्याची गरज : सद्गुरू

सद्गुरूंनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. माती वाचवण्यासाठी उपायांची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सरकारच्या दीर्घकालीन उपक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे. आपल्याला देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करायची असेल, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवायचे असेल, जैवविविधता वाढवायची असेल आणि आपल्या मातीत सुपीकता वाढवायची असेल तर माती वाचवणे खूप महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. कॉन्शियस प्लॅनेटच्या ङ्गमाती वाचवाफ मोहिमेची आवश्यक मंत्रालयांसोबत काम करण्याची तयारी आहे. हे घडवून आणण्यासाठी या दिशेने गतिमान पावले उचलण्याची विनंती सद्गुरूंनी पंतप्रधानांना केली.

माती वाचवा मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान 3 ते 6% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे. या किमान सेंद्रिय सामग्रीशिवाय मृदा शास्त्रज्ञांनी माती नापीक होण्याचा इशारा दिला आहे. या प्रक्रियेला ते ङ्गमाती नामशेष होणेफ म्हणून संबोधत आहेत. भारतात देशातील सुमारे 30% सुपीक माती आधीच नापीक झाली आहे.

उत्पादन देण्यास असमर्थ आहेत. सध्याच्या मातीच्या र्‍हासाच्या दरानुसार 2050 पर्यंत पृथ्वीचा 90% भाग वाळवंटात बदलू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. ही आपत्ती टाळण्यासाठी सद्गुरूंनी या वर्षी मार्चमध्ये ङ्गमाती वाचवाफ चळवळ सुरू केली. 27 देशांचा प्रवास करून, नेते, राजकारणी, शास्त्रज्ञ आणि नागरिकांच्या भेटी घेऊन माती वाचवण्यासाठी पाठिंबा मिळवला. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन, युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम, यूएन वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरद्वारे 'माती वाचवा' मोहिमेला पाठिंबा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com