सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सुविधा बंद, काय आहे जाणून घ्या...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सुविधा बंद, काय आहे जाणून घ्या...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (government servant)एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोना काळात अनेक सवलती देण्यात आल्या होत्या.आता पुन्हा कोव्हिड आधीच्या काळाप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात होत आहे. कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आता रद्द केल्या जात आहेत. आता ८ सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पूर्णवेळ हजेरी नोंदवावी लागणार आहे. हजेरी नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली (Biometric Attendance) पूर्ववत करण्यात येत आहे. सरकारने नवीन दिशानिर्देश ( Guideline)काढले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सुविधा बंद, काय आहे जाणून घ्या...
ड्रग्ज प्रकरणातील धुळ्याचा सुनील पाटील अन् मोहीत कंबोज

केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवणे आवश्यक असेल. सर्व कर्मचारी हजेरी नोंदवण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करतील. बायोमेट्रिक हजेरी नोंदवताना कर्मचाऱ्यांना आपापसात सहा फुटांचे अंतर राखावे लागेल. शिवाय दरवेळी मास्क परिधान करणे या कर्मचाऱ्यांना अनिवार्य असेल.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सुविधा बंद, काय आहे जाणून घ्या...
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

सरकारी आदेशात काय आहे?

  • केंद्र सरकारकडून संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

  • बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असेल.

  • सर्व कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदवण्यापूर्वी आणि नंतर त्यांचे हात स्वच्छ करावे लागतील.

  • बायोमेट्रिक हजेरी नोंदवताना कर्मचाऱ्यांना आपापसात सहा फुटांचे अंतर राखावे लागेल.

  • सर्व कर्मचाऱ्यांनी नेहमी मास्क घालणे आवश्यक आहे.

  • बायोमेट्रिक मशीनचे टचपॅड वारंवार स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत.

  • हे कर्मचारी हजेरी नोंदवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड मार्गदर्शक तत्त्वे सांगतील.

  • बायोमेट्रिक मशीन मोकळ्या वातावरणात ठेवावी.

  • जर मशीन आत असेल तर तेथे पुरेसे नैसर्गिक वायु असावे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com