Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यासरकारी कर्मचारी आहात? केंद्राची नवी नियमावली जाहीर

सरकारी कर्मचारी आहात? केंद्राची नवी नियमावली जाहीर

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

करोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत (Covid 19 outbreak) असल्याने चिंतेचे मळभ दाटले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नवी नियमावली जाहीर केली आहे. (New guidelines for government employees) 50 टक्के कर्मचारी कामावर बोलवावे असे या नियमावलीतून स्पष्ट करण्यात आले आहे….

- Advertisement -

World Braille Day 2022 : जाणून घ्या, का साजरा केला जातो जागतिक ब्रेल दिवस? काय आहे इतिहास?

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) वाढत असलेला संसर्ग आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली करोनाबाधितांची संख्या यामुळे राज्य आणि केंद्राकडून नियम घातले जात आहेत.

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन फक्त 50 टक्के उपस्थिती ठेवावी. जे कर्मचारी कंटेमेंट झोनमध्ये राहतात, त्यांना कार्यलयात येऊ देऊ नये.

सरकारी कार्यालयात 50 टक्के इतकीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी. उर्वरित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ (Work from home) देण्यात यावे असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहे.

दिव्यांग, अपंग कर्मचारी यांना कार्यलयात बोलविण्यात येऊ नये. गरोदर महिलांना सूट दिली जावी. अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या