Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याWhatsApp या फिचरमुळे ग्रुपच्या त्रासपासून सुटका

WhatsApp या फिचरमुळे ग्रुपच्या त्रासपासून सुटका

व्हॉट्सऍपवर नवे अपडेट आले आहे. हे अपडेट केल्यानंतर तुम्हाला ग्रुप्सचे नोटिफिकेशन कायमसाठी म्युट करता येणार आहे.

व्हॉट्सअँपने अँड्रॉईड आणि IOS दोन्ही युजर्ससाठी हे फीचर दिले आहे. या दोनही प्लॅटफॉर्मवर युजर्सला ग्रुप्स अथवा चॅटचे नोटिफिकेशन नेहमीसाठी म्युट करण्याचा ऑप्शन आहे. प्रत्येक युझरच्या व्हॉट्सअॅपमध्ये असे काही ग्रुप्स असतात ज्यांचे सदस्य असणे ही एक प्रकारची मजबुरी असते. हे फॅमिली ग्रुप्सपासून ते ऑफिशियल ग्रुप्स अशू शकतात.

- Advertisement -

व्हॉट्सअँपने आपल्या ट्विटर अकाऊंट ग्रुप्समधील ‘Always Mute’ या ऑप्शनबद्दल सांगितले. जर तुम्ही एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या Mute Notificationsच्या सेटिंग्समध्ये गेला तर तुम्हाला तेथे म्युटचा ऑप्शन दिसेल. यापुर्वी हे 1 Week आणि 8 hours साठी होते. मात्र आता तेथे तुम्हाला Always हा ऑप्शन दिसेल. एकदा ग्रुप म्युट केल्यानंतर तुम्हाला आता कधीही हे नोटिफिकेशन्स त्रास देणार नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या