Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याGoogle सर्चमध्ये होणार हा मोठा बदल, सर्चच्या वेळेत होणार बचत

Google सर्चमध्ये होणार हा मोठा बदल, सर्चच्या वेळेत होणार बचत

नवी दिल्ली

Google जगातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे. गुगलने एखादा लहान बदल केला तरी त्याचा प्रभाव जगातील कोट्यावधी लोकांवर पडतो. गुगल आता आपल्या इंटरफेसमध्ये बदल करत असल्याचे वृत्त आहे. यामुळे सर्चच्या वेळात बचत होणार आहे.

- Advertisement -

9 To 5google च्या रिपोर्टनुसार, सर्च इंजिनमध्ये दिलेल्या या फिचरमुळे युजर्स लिंकवर माऊस घेऊन जाताच त्याला प्रिव्यू दिसेल. यामुळे कोणत्या वेबसाइटवर व्हिजिट करावी याची माहिती युजरला मिळेल. काही युजरला प्रायव्हेट मोडवर ब्राउजिंग करत असताना या फिचर दिसत आहे.

काया आहे हे फिचर ?

गुगलमध्ये आपण सर्च केल्यावर हजारो रिझल्ट्स आपल्यासमोर येतात. त्यानंतर कोणती वेबसाइट ओपन करावी हा पर्याय आपल्याकडे असतो. आपण ज्या लिंकवर क्लिक करु ती वेवसाइट ओपन होते. परंतु नवीन फिचरमध्ये त्या लिंकवर माऊस घेऊन गेल्यावर काही प्रिव्यू दिसेल. यामुळे कोणती वेबसाईट ओपन करावी त्याचा अंदाज युजरला येईल. यामुळे ती वेबसाईट ओपन करावी की नाही याचा निर्णय युजरला ती वेबसाईट ओपन न करताच समजेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या