Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रअकरावी प्रवेशासंदर्भात शासनाने घेतला हा निर्णय

अकरावी प्रवेशासंदर्भात शासनाने घेतला हा निर्णय

मुंबई

नाशिकसह (nashik)राज्यातील काही शहरांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया (admission process) केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. आजपासून दुसरी फेरी सुरु होत आहे. परंतु विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र (certificate)उपलब्ध नसल्यानं अडचणी निर्माण होत होत्या. शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

वर्षा गायकवाड (varsha gaikwad)यांनी यासंदर्भात टि्वट करुन माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसेल ते विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करु शकतात. अकरावीसाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीला विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केल्याची पोहोच किंवा ती उपलब्ध नसल्यास वडिलांच्या जात प्रमाणपत्राची प्रत सादर करुन प्रवेश निश्चित करु शकतात. प्रवेश निश्चित करणारे विद्यार्थ्यांना ३० दिवसांच्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या