देशातील करोनाचा आलेख वाढताच, गेल्या २४ तासांत तब्बल १३ हजार नवे रुग्ण

देशातील करोनाचा आलेख वाढताच, गेल्या २४ तासांत तब्बल १३ हजार नवे रुग्ण

दिल्ली | Delhi

करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात १३ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)

गेल्या २४ तासात १३ हजार २१६ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ६८ हजार १०८ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासात ८ हजार १४८ लोक करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत देशात एकूण बरे झालेल्यांची संख्या ४ कोटी २६ लाख ९० हजार ८४५ आहे. करोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या ५ लाख २४ हजार ७९२ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४ हजार १६५ नवे रुग्ण आढळून आले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद येथे झाली आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २१ हजार ७४९ झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com