देशातील करोनाचा आलेख किंचित घसरला, गेल्या २४ तासांत आढळले 'इतके' नवे रुग्ण

देशातील करोनाचा आलेख किंचित घसरला, गेल्या २४ तासांत आढळले 'इतके' नवे रुग्ण

नवी दिल्ली । New Delhi

गेल्या काही दिवसांपासून देशभरात करोना (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच देशात महाराष्ट्र (Maharashtra) आणि दिल्लीमध्ये (Delhi) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या (Department of Health) चिंतेत वाढ झाली आहे...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एकूण ७२ हजार ४७४ सक्रिय रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. तर गेल्या २४ तासांत देशात करोनाचे तब्बल १२ हजार ८९९ नवीन रुग्ण (Patient) आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासात १५ जणांचा मृत्यू झाला असून ८ हजार ५१८ रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या किंचित घसरली आहे.

तसेच आदल्या दिवशी (दि.१८) १३ हजार २१६ नवीन करोना रुग्णांची नोंद आणि एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढले आहे.

दरम्यान, राज्यात (state) काल दिवसभरात ३,८८३ रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७.९५ टक्के इतका आहे. तसेच गेल्या २४ तासात एकूण २,८०२ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले असून राज्यात आज मितीला एकूण २२,८२८ सक्रिय रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com