Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याची नवीन नियमावली, नाशिकमधील मॉल होणार बंद

राज्याची नवीन नियमावली, नाशिकमधील मॉल होणार बंद

मुंबई : mumbai

राज्यात कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असल्याने लावण्यात आलेले कडक निर्बंध 5 टप्प्यांमध्ये शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहिला मिळतोय. त्यातच डेल्टा प्लस (Delta Variant) व्हेरिएंटमुळे राज्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पाचपैकी पहिले दोन वर्ग रद्द करत असल्याचं सरकारी आदेशात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे सोमवारी नाशिक (Nasik)मध्ये सुरु झालेले मॉल पुन्हा बंद होणार आहे. म्हणजेच हे मॉल फक्त सहा दिवसच सुरु राहिले.

- Advertisement -

तज्ज्ञ म्हणतात, पेट्रोल 125 पर्यंत जाणार ? का जाणून घ्या

रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे (Delta Variant) २१ रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्याचा प्रसार वेगानं होत असल्याचं आढळून आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागानं तातडीनं नवे आदेश काढले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या महापालिका आणि जिल्ह्यांना सध्या तिसऱ्या वर्गासाठी असलेले नियम लागू होणार आहेत. करोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची संख्या कितीही कमी झाली तरी यापुढं राज्यातील सर्व जिल्हे निर्बंधांच्या दृष्टीनं तिसऱ्या स्तरावरच असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील आदेशापर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. नव्या आदेशामुळं सध्या पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर असलेले जिल्हे थेट तिसऱ्या स्तरावर आले आहेत.

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या धोरणानुसार पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या जिल्ह्यांत आणि महापालिका क्षेत्रात मॉल्स आणि थिएटर्स सुरू करायला परवानगी दिली होती. मात्र तिसऱ्या वर्गासाठी ही परवानगी नव्हती. आता एखादं महानगर किंवा जिल्हा अगदी पहिल्या वर्गात जरी मोडत असेल, तरी सध्या तिसऱ्या वर्गासाठी असलेले नियमच लागू होणार आहेत. तिसऱ्या वर्गात मॉल आणि थिएटर्सना मनाई आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्हीटी दर किती कमी झाला आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता कितीही वाढली, तरी मॉलमध्ये फिरायला जाण्याचं किंवा थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जाण्याचं स्वप्न आणखी काही काळ गुंडाळूनच ठेवावं लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या