
नवी दिल्ली
काँग्रसमधील अंतर्गत भांडणाच्या पाश्वभूमीवर पक्षाच्या कार्यकारी समिती (CWC)ची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी राहुल गांधी यांना हस्तक्षेप करावा लागला.
काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाली. शामिल गुलाम नबी आजाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक व पी चिदंबरम यांनी अध्यक्षपदासाठी त्वरित निवडणूक घेण्याची मागणी केली. परंतु अशोक गहलोत, अमरिंदर सिंग, एके एंटनी, तारिक अन्वर व ओमान चांडी यांनी विरोध केला. पाच राज्यातील निवडणुकीनंतर अध्यक्षपदाची निवड करण्याची मागणी त्यांनी केली. अखेरी पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यावर काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे.
जून २०२१ मध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती के सी वेगणुगोपाल यांनी कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा सोनिया गांधी करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १९९७ मध्ये अखेरची निवडणूक झाली होती.