Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकोरोनाची लाट ओसरली, सरकारी कार्यालयात पुन्हा बायोमेट्रिक

कोरोनाची लाट ओसरली, सरकारी कार्यालयात पुन्हा बायोमेट्रिक

मुंबई / प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीला सुरवात झाली आहे. त्यानंतर आता हजेरीसाठी बायोमेट्रिक्सची पद्धत पुन्हा सुरु झाली आहे.

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या तिघांना अटक

- Advertisement -

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने मंत्रालयसह इतर शासकीय कार्यालयात बंद ठेवण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरीची पद्धत पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनामुळे मंत्रालयासह शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्यात आली होती.

ब्रेक द चेन अंतर्गत जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यातील शासकीय कार्यालये १०० टक्के उपस्थितीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट २०२१ पासून पूर्ण क्षमतेने कार्यालये सुरु झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक पद्धत सुरु करण्याची मुभा दिली आहे.ही बायोमेट्रिक पध्दत सुरु करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन ही बायोमेट्रिक पद्धत सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बायोमेट्रिक्स वापरताना हात सॅनिटायझर करणे आणि इतर आवश्यक उपाययोजना राबविण्याची सूचना दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या