Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानवीन कृषी कायदा : केंद्र सरकारला हादरवणारे कोण आहेत शेतकरी आंदोलनातील नेते

नवीन कृषी कायदा : केंद्र सरकारला हादरवणारे कोण आहेत शेतकरी आंदोलनातील नेते

गेल्या १६ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यामुळे केंद्र सरकारसोबत आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या सर्व फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. कृषी कायद्यांविरोधातील या आंदोलनात मुख्यत: पंजाबच्या काही शेतकरी संघटनांचा पुढाकार आहे. गेल्या १६ दिवसांपासून या संघटनांनी सरकारच्या नाकात दम आणला आहे. जाणून घेऊयात शेतकऱ्यांच्या या आंदोलनातल्या नेत्यांविषयी…

जोगिंदर सिंह उगराह

भारतीय किसान युनियनचे प्रमुख जोगिंदर सिंह उगराह आहे. हे देशातल्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा आहेत. संगरुर जिल्ह्यातील सुनाम शहरात ते राहतात. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले.२००२ मध्ये त्यांनी भारतीय किसान युनियन (उगराह)ची स्थापना केली. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते संघर्ष करत आहेत.जोगिंदर सिंह अमोघ वक्तृत्वासाठी ओळखले जातात. लोकांना एकत्र आणणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. पंजाबमधील मालवा हा त्यांचा बालेकिल्ला आहे.

- Advertisement -

रुल्दू सिंग मंसा

पंजाब शेतकरी संघटना ही संघटनेचे अध्यक्ष रुल्दू सिंग मंसा आहेत. हे चार दशकांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत आहेत. या संघटनेचा सीपीआय (एमएल) लिबरेशनशी अगदी जवळचा संबंध असल्याचं सांगितलं जातं. या संघटनेनं सुरुवातीला अमित शहा यांना भेटण्यास नकार दिला होता.

कंवलप्रीतसिंग पन्नू

किसान संघर्ष कमिटीची २००० मध्ये स्थापन करण्यात आली. कंवलप्रीतसिंग पन्नू यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते. या समितीने भूसंपादनाच्या चळवळीत भाग घेतला आहे.

सरवन सिंह पंधेर

किसान मजदूर संघर्ष समितीचे सरवन सिंह पंधेर महासचिव आहेत.संघटनेचं कार्यक्षेत्र दोआबा आणि मालवा या भागातील दहा जिल्ह्यांमध्ये आहे. त्यांचे मूळ गाव अमृतसर जिल्ह्यातलं पंधेर आहे. ते पदवीधर आहेत आणि विद्यार्थी दशेपासूनच आंदोलनात सहभागी होत आहेत

डॉ. दर्शनपाल

डॉ. दर्शनपाल हे क्रांतिकारी किसान युनियनचे नेते आहेत. पटियाला शहराजवळ त्यांचं काम आहे. संख्याबळाच्या दृष्टीने त्यांची संघटना लहान आहे मात्र डॉ. दर्शनपाल तीसहून अधिक शेतकरी संघटनांच्या समन्वयाचं काम करतात. म्हणूनच शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे.

जगमोहन सिंह

भारतीय किसान युनियन डकौंदाचे जगमोहन सिंह नेते आहेत. उगराहा संघटनेनंतरची ही मोठी संघटना मानली जाते.1984 मध्ये शिखांच्या संहारानंतर ते पूर्णवेळ सामाजिक कार्यात उतरले. राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये ते सक्रिय आहेत.

बलबीर सिंह राजेवाल

भारतीय किसान युनियनच्या संस्थापक नेत्यांपैकी एक बलबीर सिंह राजेवाल आहेत. पंजाबमधल्या खन्ना जिल्ह्यातील राजेवाल हे त्यांचे मूळ गाव. भारतीय किसान युनियनची घटनाही राजेवाल यांनीच लिहिली होती. बलबीर सिंह राजेवाल मालवा कॉलेज प्रबंधन समितीचे अध्यक्षही आहेत. समराला भागातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या