Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात ३०५ नवे करोनाग्रस्त

जिल्ह्यात ३०५ नवे करोनाग्रस्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून आज चोवीस तासांत जिल्ह्यात ३०५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ११ हजार २७४ इतका झाला आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून विक्रमी १ हजार ५४९ नवे संशयित दाखल झाले आहेत. काल शहरासह जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात एकूण ३०५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये एकट्या नाशिक शहरातील १९३ रुग्ण आहेत. यात शहरातील जेलरोड, पंचवटी, सातपूर गाव, दसक, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, हिरावाडी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड येथील रुग्णांंचा समावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ६ हजार ९८६ वर पोहोचला आहे.

आज ग्रामणी भागातील ९८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा २ हजार ८९५ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक येवला, सिन्नर, सुरगाणा, नांदुर खुर्द, राणमळा, विंचूर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रुग्ण आहेत.

मालेगावात आज १३ रुग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार २३८ झाला आहेे. जिल्हा बाह्य रुग्णांचा आकडा १५५ वर स्थिर आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक ४ रुग्ण नाशिक शहरातील २ ग्रामीण भागातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ४३९ झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील ३४९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोनामुक्त होणार्‍यांचा आकडा ८ हजार १४७ वर पोहोचला आहे. करोना रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने १ हजार ५४९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक १ हजार ४ तर उर्वरित जिल्ह्यातील ३५२ आहेत. जिल्हा रुग्णालय १२, मालेगाव १६, डॉ. वसंतराव पवार रुग्णालय १३ व होम क्वारंटाईन १५५ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून ३८ हजार ८६९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २६ हजार ६४१ निगेटिव्ह आले आहेत. ११ हजार २७४ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार ६८८ रुग्ण उपचार घेत आहेत.

एकूण करोनाबाधित – ११,२७४

नाशिक- ६९८६

मालेगाव- १२३८

उर्वरित जिल्हा- २८९५

जिल्हा बाह्य- १५५

एकूण मृत्यू- ४३९

करोनामुक्त- ८१४७

- Advertisment -

ताज्या बातम्या