नेट परीक्षेसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली । New Delhi

देशभरात कोरोनाच्या (corona) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणी (National Eligibility Test) म्हणजे नेट (NET) परीक्षेच्या नोंदणीसाठी अर्ज (Application) करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे…

डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ या दोन्ही महिन्यांच्या परीक्षांसाठी या तारखा वाढवण्यात आल्या आहेत. यावेळी डिसेंबर २०२१ ची परीक्षा जून २०२२ च्या परीक्षेत विलीन करण्यात आली आहे.

याबाबत यूजीसीचे (UGC) चेअरमन ममिदला जगदेश कुमार (Mamidala Jagadesh Kumar) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे की, युजीसी नेट (UGC NET) डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ ऑनलाइन (online) अर्ज सादर करण्याबाबत उमेदवारांच्या विनंतीनुसार अर्ज सादर करण्याची आणि फी भरण्याची अंतिम तारीख ३० मे २०२२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या परीक्षेसाठी पात्र असणारा उमेदवार नवीन तारखेपर्यंत युजीसी नेट डिसेंबर २०२१ व जून २०२२ या दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना युजीसी नेट (UGC NET) परीक्षा २०२१ आणि २०२२ (UGC NET 2021, 2022 Registrations Last Date) साठी ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *