नेपाळमध्ये २२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता; ४ भारतीय नागरिकांचा समावेश

नेपाळमध्ये २२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता; ४ भारतीय नागरिकांचा समावेश

दिल्ली | Delhi

नेपाळमध्ये (Nepal) २२ जणांना नेणाऱ्या एका विमानाचा संपर्क अचानक तुटला आहे. या विमानात एकूण २२ प्रवाशी होते.

'तारा एअर' कंपनीचे (Tara Air flight missing हे विमान होते. विमान कोसळले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या विमानात नेपाळी नागरिकांसह ४ भारतीय आणि ३ जपानी नागरिकदेखील प्रवास करत होते.

विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, अल्फा इको टँगो कॉल साइन असलेल्या विमानाने पोखराहून जोमसोमसाठी सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले. १०.२० ला लँड करणार होते, पण ११.०० वाजून गेल्यानंतरही संपर्क झाला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com