Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशनेपाळ विमान दुर्घटना : १६ वर्षांपूर्वी विमान अपघातात पती गेला, अन् आता...

नेपाळ विमान दुर्घटना : १६ वर्षांपूर्वी विमान अपघातात पती गेला, अन् आता ‘ती’ही…; दुर्दैवी योगायोग ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले

मुंबई | Mumbai

नेपाळमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने लोकांना हादरवून सोडले आहे. लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वी कोसळलेल्या विमानात ६८ प्रवाशी आणि ४ क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते.

- Advertisement -

परदेशी नागरिकांमध्ये पाच भारतीय, चार रशियन, दोन दक्षिण कोरियाचे आणि प्रत्येकी एक आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि फ्रान्सचा समावेश आहे. या दरम्यान, या अपघातात कोसळलेल्या विमानाची को-पायलट अंजू खतिवडा ( Anju Khativada) यांच्याबद्दल ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.

कॅप्टन कमल केसी आणि अंजू खतिवडा हे दोघेजण विमानाचे सारथ्य करत होते. सहवैमानिक असणाऱ्या अंजू खतिवडा यांना या उड्डाणानंतर प्रमोशन मिळणार होते, त्या कॅप्टन होणार होत्या. विमानाचा कॅप्टन होण्यासाठी संबंधित व्यक्तीला १०० तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव असावा लागतो. अंजू यांच्या विमानाने रविवारी सकाळी काठमांडू येथून हवेत झेप घेतली.

“राजा का बेटा राजा नही बनेगा” म्हणत, सत्यजीत तांबेंच टेन्शन वाढवणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण?

२५ मिनिटांचे अंतर पार केल्यानंतर हे विमान पोखरा विमानतळावर उतरणार होते. मात्र, विमान हवेतून खाली येताना पोखरा येथील नव्या धावपट्टीवर उतरत होते. या धावपट्टीपासून काही अंतरावरच पोखराची जुनी धावपट्टी आहे. मात्र, विमान उतरताना तांत्रिक बिघाडामुळे ते दोन्ही धावपट्ट्यांच्या मध्ये असणाऱ्या सेती नदीपात्राच्या खोल दरीत कोसळले.

विमानाचे लँडिंग यशस्वी ठरले असते तर अंजू यांना कॅप्टनची पोस्टही मिळाली असती आणि प्रवाशांचा जीवही वाचला असता. नियोजित वेळापत्रकानुसार विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी अवघ्या १० सेकंदांचा अवधी शिल्लक होता. त्यामुळे अंजू यांचे स्वप्न काही सेकंदात झालेल्या अपघातामुळे बेचिराख झाले. त्यांची ही कहाणी एकून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.

…अन् सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, भर कार्यक्रमातच घटना; नेमकं काय घडलं?

दुर्दैवी योगायोग म्हणजे को पायलट अंजू यांच्या पतीचे निधन देखील विमान अपघातामध्ये झाले होते. त्यांचे पती दीपक पोखरेल येती एअरलाईन्स एअरक्राफ्टचे (Yeti airlines aircraft) को पायलट होते. १६ वर्षांपूर्वी २१ जून २००६ मध्ये एका विमान दुर्घटनेत अंजू यांच्या पतीचे निधन झाले. नेपालगंज मधून सुर्खेत मार्गे जुम्ला याठिकाणा जाणाऱ्या 9N AEQ या विमानाचा अपघात झाला होता. ज्यामध्ये ६ प्रवाशी आणि ४ क्रू सदस्यांचा मृत्यू झाला.

गायिकेचाही मृत्यू

या अपघातात नेपाळच्या परिचित गायिका नीरा छन्त्याल यांचाही मृत्यू झाला. पोखरा येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या विमानाने प्रवास करत होत्या. नीरा यांची गाणी लोकांच्या पसंतीसही उतरली होती.

भीषण अपघात : कंटेनरने दुचाकीला १०० फुटापर्यंत फरफटत नेलं, एकाचा जागीच मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या