वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसी, ईडब्ल्यूएस आरक्षणास सुप्रीम कोर्टाची मंजुरी

वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसी, ईडब्ल्यूएस आरक्षणास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
सर्वोच्च न्यायालय

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court)वैद्यकीय अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या ओबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या आरक्षणास यावर्षासाठी मंजुरी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर ओबीसीच्या (OBC) 27 टक्के आरक्षण आणि ईडब्ल्यूएसच्या (EWS) 10 टक्के आरक्षणाच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालय
नाशिकमधील सर्व शाळा सोमवारपासून बंद : वाचा काय आहेत निर्बंध ?

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टानं 27 टक्के ओबीसी आरक्षणासंदर्भातील घटनात्मक वैधता मान्य केली. तर, ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात चालू वर्षीची प्रवेश प्रक्रिया सध्याच्या नियमानं पार पाडण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणखी उशिरा होऊ नये म्हणून कोर्टाकडून ही दक्षता घेण्यात आली. ईडब्लूएस आरक्षणाच्या निकषासंदर्भातील अंतिम निर्णय हा याचिकेच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं.

सर्वोच्च न्यायालय
पंजाबमध्ये सुरक्षेत चूक; मोदींनी घेतली राष्ट्रपतींचे भेट : मोठी कारवाई होणार?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com