NEET PG 2022 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

NEET PG 2022 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

दिल्ली | Delhi

देशात मागील अनेक दिवसांपासून मोठा चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पीजी (NEET PG exam 2022) परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

NEET PG 2022 ची परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. NEET PG 2022 च्या उमेदवारांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन सादर केले होते.

या निवेदनामध्ये NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. NEET PG 2022 परीक्षा २१ मे रोजी नियोजित असून, ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दिल्लीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी एक निवेदन दिले होते. मात्र, आता ही परीक्षा नियोजित वेळेपत्राकानुसार होणार आहे.

Related Stories

No stories found.