Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यावैद्यकीय प्रवेशासाठी आज 'नीट' परीक्षा

वैद्यकीय प्रवेशासाठी आज ‘नीट’ परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) National Testing Agency वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नीट) परीक्षा आज दि. 12 रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत होणार आहे.

- Advertisement -

परीक्षा NEET Exam ऑफलाइन पद्धतीने नाशिकसह देशभरातील 202 शहरांमध्ये होणार आहे. परीक्षेला लाखो विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेदरम्यान करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

एनटीएच्या वतीने नीट परीक्षेचे केंद्र जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र जाहीर केल्यानंतर नमुना ओएमआर जाहीर करून ती कशी भरायची या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड़, मराठी, तामिळ, तेलुगू उर्दू यांसह एकूण 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

नीट परीक्षा देताना परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकेवर खाडाखोड करू नये. विद्यार्थ्यांनी विचारण्यात आलेल्या माहितीशिवाय इतर कोणतीही माहिती भरू नये. खाणाखुणा करू नयेत, ओएमआरवर दिलेल्या ठिकाणी विहित ठिकाणी नाव भरावे.

उत्तर पत्रिकेवरील घोषणापत्राखाली सही करावी नीट प्रश्नपत्रिकेवरील बुकलेट कोड, बुकलेट क्रमांक नोंदवण्यास विसरू नये. एका उत्तरासाठी अधिक पर्याय नोंदवू नये, अशा विविध मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यासाठी https://neet.nta.nic.in/या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रवेशपत्र सोबत बाळगावे

विद्यार्थ्यांना या परीक्षेचे सुधारित प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. हे सुधारित हॉलतिकीट विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन एनटीएने केले आहे.

एका वर्गात फक्त 12 विद्यार्थी

नीट परीक्षेसाठी निर्धारित केंद्रांमध्ये वर्गांची संख्या वाढविण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग राहण्यासाठी एका वर्गात 12 पेक्षा जास्त उमेदवार बसविले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर दिले जाईल. सॅनिटायझर आणि हँडवॉश परीक्षा हॉलमध्ये असेल. सर्व परीक्षा केंद्रे परीक्षेच्या आधी आणि नंतर दोनदा स्वच्छ केली जाणार आहेत. तसेच बाहेर पालकांची गर्दी होऊ नये, यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल, कोणत्याही पालकास केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

हजारांहून अधिक परीक्षार्थी

नीट परीक्षेला नाशिकमध्ये 24 परीक्षा केंद्रांवर 8 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत परीक्षा होणार असून टप्याटप्याने विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षार्थींनी स्वतःजवळ प्रवेशपत्र व एक शासकीय ओळखपत्र ठेवावे, हॉलतिकीट बारकोड स्कॅनरच्या सहाय्याने तपासले जाणार आहेत. अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या