World Athletics Championships: नीरज चोप्राने रचला इतिहास; रौप्यपदकावर कोरले नाव

World Athletics Championships: नीरज चोप्राने रचला इतिहास; रौप्यपदकावर कोरले नाव

नवी दिल्ली । New Delhi

भारताचा तारांकित भालाफेकपटू (Javelin thrower) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची (Silver Medal) कमाई करत भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे...

नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केले. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने (Anju Bobby George) २००३ मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (World Athletics Championships) कांस्यपदक (Bronze Medal) जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

तसेच नीरजने अंतिम सामन्यात फाऊल थ्रोने सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात ८२.३९ मीटर भाला फेकला. यावेळी तो बराच मागे होता. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नीरजने ८६.३७ मीटर भाला फेकला तर चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर भाला फेकत दुसऱ्या क्रमांकांवर झेप घेतली. त्यानंतर नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरल्याने त्याला शेवटच्या प्रयत्नात ९० मीटर भाला फेकता आला नाही. तर युजीनमध्ये (Eugene) सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते.

दरम्यान, अंतिम स्पर्धेत ग्रेनेडाच्या (Grenada) अँडरसनन पीटर्सने (Anderson Peters) ९०.५४ मीटर अंतरावर भालाफेक करत पहिले स्थान मिळवले. पहिल्या प्रयत्नात त्याने ९०.२१ मीटर आणि त्यानंतर ९०.४६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्यानंतर सहाव्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com