World Athletics Championships : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक

World Athletics Championships : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक

मुंबई । Mumbai

टोक्यो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) गोल्ड मेडल विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने अमेरिकेत (America) सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत (World Athletics Championships) पहिल्याच प्रयत्नात १२ सेकंदामध्ये ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे...

पात्रता फेरीसाठी २४ वर्षीय नीरज चोप्रा ‘अ’ गटामध्ये होता. भाला फेकण्यासाठी सर्वात पहिला क्रमांक नीरज चोप्राचा होता. युजीनमध्ये (Eugene) सुरु असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ८३.५० मीटर अंतर पार करण्याची आवश्यकता असते. ‘अ’ गटात नीरज चोप्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली. या गटातून टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच याने देखील अंतिम फेरी गाठली.

दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ८ महिन्यांनी पुन्हा मैदानावर उतरलेल्या नीरज चोप्राने मागील तीन सामन्यांत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. १४ जूनला फिनलँड (Finland) येथील तुर्कू येथे झालेल्या पाओ नुरमी (Paavo Nurmi) स्पर्धेत त्याने ८९.३० मीटर लांब भालाफेक (Javelin throw) करून रौप्यपदक जिंकले होते. चार दिवसांनी फिनलँडच्या कौर्टने येथील स्पर्धेत त्याने ८६.६९ मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर ३० जूनला स्वीडन (Sweden) येथे पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेत (Diamond League tournament) ८९.९४ मीटर लांब भाला फेकून राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक (silver medal) नावावर केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com