Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात लवकरच सुईरहित लस

जिल्ह्यात लवकरच सुईरहित लस

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राज्यात करोना (corona) प्रतिबंधक लस (vaccine) इंजेक्शन (Injection) स्वरुपात सर्वत्र उपलब्ध आहे. गेल्या सव्वा वर्षापासून सर्वत्र लसीकरण (vaccination) सुरू असून काही ठिकाणी मात्र सुईला (Needle) घाबरून लस घेण्याचे टाळत असल्याचे समोर आले आहे. याचे प्रमाण ग्रामीण तसेच आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात आहे. यावर पर्याय म्हणून झायकोव्ही डी (zycov-d) ही लस उपलब्ध करण्यात येणार होती.

- Advertisement -

मध्यंतरी सुईरहीत लस देण्याचे महापालिकेत प्रशिक्षणही (training) झाले होते. मात्र, गेले दोन महिने झाले तरी ही लस उपलब्ध होत नव्हती. मात्र, आता राज्य शासनाला (state government) या लसीचे पाच लाख डोस उपलब्ध झाले असून, लवकरच ते नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) मिळणार असल्याने प्रतीक्षा संपणार आहे. दरम्यान, राज्यात अशा प्रकारे निडल लेस व्हॅक्सिनेशनसाठी (Needle less vaccination) नाशिक (nashik) आणि जळगाव (jalgaon) या दोन शहरांची प्रायोगिक स्तरावर निवड करण्यात आली आहे.

त्यासाठी नाशिक महापालिकेत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र, प्रशिक्षण पूर्ण होऊन दोन ते तीन महिने झाले, परंतु डोसच प्राप्त झालेला नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला (maharashtra) झायकोव्ही-डीचे (zycov-d) पाच लाख डोस प्राप्त झाले असून, लवकरच ते नाशिक आणि जळगावला वितरित होणार आहेत.

महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे (Medical Superintendent Dr. Bapusaheb Nagargoje) यांनी त्याला दुजोरा दिला असून, अद्याप डोस मिळाले नसले, तरी राज्य शासनाला प्राप्त झाल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून करोना (corona) प्रतिबंधक लसीकरणाला (vaccination) प्रारंभ झाला असून, नाशिक शहरात 18 वर्षांवरील 86 टक्के नागरिकांनी पहिला तर 60 टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. मात्र अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यातील काही नागरिक स्वेच्छेने लसीकरण करण्यास तयार नाहीत. मात्र अनेक जण केवळ सुईच्या भीतीने लसीकरण करण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा नागरिकांना निडल लेस म्हणजे सुईरहीत लसीकरण उपयुक्त ठरणार आहे.

मनपा कार्यक्षेत्रात पॉझिटिव्ह रेट 1.40

जिल्ह्यात करोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात आज अवघे 20 रुग्ण आढळून आले आहे. आज महापालिका कार्यक्षेत्रात रुग्ण बाधित होण्याचा दर 1.40 एवढा आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये कमालीची घट बघायला मिळत आहे. आज जिल्हा प्रशासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 660 झालेली आहे.

दरम्यान, नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 37, बागलाण 30, चांदवड 28, देवळा 20, दिंडोरी 35, इगतपुरी 12, कळवण 39, मालेगाव 10, नांदगाव 27, निफाड 70, पेठ 16, सिन्नर 38, सुरगाणा 41, त्र्यंबकेश्वर 41, येवला 29 असे एकूण 473 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 145,

मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 11 तर जिल्ह्याबाहेरील 31 रुग्ण असून असे एकूण 660 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 75 हजार 445 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील 4 लाख 65 हजार 897 करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 8 हजार 888 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या