Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअन्नपदार्थ निवडीबाबत नवी पिढी सजग करण्याची गरज

अन्नपदार्थ निवडीबाबत नवी पिढी सजग करण्याची गरज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आपल्या पूर्वीच्या पिढ्यांसाठी खाण्याची निवड आणि पोषण यासंदर्भात आई- आजी वर्गाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पुढच्या पिढ्यांना अन्न पदार्थांसाठी निवड करण्याबाबत aware about food choices शिक्षित करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar यांनी केले.

- Advertisement -

एफएसएसएआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणके प्राधिकरणाच्या Food Safety and Standards Authority of India कामाचा आढावा घेण्यासाठी प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाला डॉ. पवार यांनी शनिवारी (दि.27) भेट दिली.यावेळी त्यांनी अन्नसुरक्षा जाणीव जागृती वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. अन्नाचा इतिहास सांगणारे पुस्तक तसेच मिठाचा कमीतकमी वापर करून केल्या जाणार्‍या पाककृतींचे पुस्तक अशा दोन पुस्तकांचे अनावरणही त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय किमान मीठ वापर पाककला स्पर्धेचा अहवाल देखील जारी करण्यात आला.

डॉ. पवार यांनी अन्नाचे परीक्षण करणार्‍या फूड सेफ्टी ऑन व्हील्स या फिरत्या वाहनांतील तांत्रिक क्षमतांचे देखील परीक्षण केले. तपासणीसाठी जमा केलेल्या अन्न पदार्थांमधील भेसळ शोधून काढण्यासाठी या वाहनांमध्ये अत्याधुनिक साधनांची सोय केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी देशभरात अन्न सुरक्षा परिसंस्थांना पाठबळ पुरविण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या वाहनांना हिरवा झेंडा दाखविला.

याप्रसंगी डॉ. पवार म्हणाल्या की, समग्र दृष्टीने पाहता अन्न हा आरोग्यासाठीचा आवश्यक घटक आहे.समतोल पोषण हा निरोगी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे त्या म्हणाल्या. अन्न सुरक्षा साध्य करण्यात सरकार आणि उद्योगांसह नागरिक हे देखील महत्त्वाचे भागधारक आहेत.यावर त्यांनी भर दिला. अन्नसुरक्षा प्राप्त करण्याच्या दिशेने देशाला पुढे नेताना औद्योगिक भागीदारांसह या संस्थेने हाती घेतलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींच्या संदर्भात एफएसएसएआयच्या कार्यांचा त्यांनी आढावा घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या