पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्याची गरज- मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार

पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्याची गरज- मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ग्लोबल वार्मिंगला (Global warming)सामोरे जाण्यास नाशिक महापालिका ( NMC )सज्ज आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सर्व उद्योजक व स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेला सहकार्य करण्याची आणि त्या दिशेने काम करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar)यांनी केले.

आयमा ( AIMA) आयोजित व स्विस एजन्सी, मनपा आणि टेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयमाच्या के. आर. बूब सभागृहात ‘स्वच्छ तंत्रज्ञानाचे पर्याय’ या विषयावर उद्योगांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी डॉ.पुलकुंडवार बोलत होते. व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, नवीदिल्लीच्या स्विस एजन्सीचे प्रमुख डॉ.जोनाथन डेमंग, कार्यक्रम अधिकारी आंद्रे मुलर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे, टेरीच्या पर्यावरण केंद्राचे अधिकारी डॉ. अरिंदम दत्ता, महिंद्रा अँड महिंद्राचे उपमहाव्यवस्थापक धनंजय जोशी, ब्रेम्बो ब्रेक इंडियाचे राकेश मुसळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे पर्यावरण अधिकारी चेतनकुमार सांगोळे, आयमा सरचिटणीस ललित बूब आदी होते.

जागतिक समस्या असलेल्या ग्लोबल वार्मिंगचा धोका वेळीच ओळखून त्याला सर्व जण सामोरे जात आहेत. उद्योजकही त्यावर उपाय शोधत आहेत ही बाब निश्चितच स्तुत्य आहे, जोनाथन डेमंग आणि आंद्रे मुलर यांनी सांगितले. प्रदूषण रोखण्यास महिंद्र कंपनीने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचे जोनाथन यांनी कौतुक केले. अमर दुर्गुळे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण रोखण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

राकेश मुसळे आणि डॉ.अरिंदम दत्ता यांनी सुयोग्य कामकाज परिस्थिती, पोषक वातावरण आणि पर्यावरणपूरक उत्पादकता याबाबत चित्रफितीतून उपस्थितांना माहिती दिली. धनंजय जोशी यांनी माहिंद्राच्या प्रकल्पात नाशिक राबवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक बाबींची माहिती दिली.

प्रारंभी निखील पांचाळ यांनी चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला. आयमाने आतापर्यंत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. चेंबर ऑफ कॉमर्सचे चेतनकुमार सांगोळे यांनी सूत्रसंचालन केले. ललित बूब यांनी आभार मानले. चर्चासत्रास 100 हून अधिक उद्योजक उपस्थित होते.

प्रदूषणाबाबत मनपा सतर्क

नाशिककरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यास मास्टर प्लॅन तयार आहे. 11 शुद्धीकरण केंद्र कार्यरत आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यांचा विस्तारही करण्यात येत आहे. वायूप्रदूषण रोखण्यास मनपाने दर्जेदार 250 बसेस खरेदी केल्या आहेत. गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी आराखडा तयार आहे. नाशकातील रस्ते चांगले करण्यावर भर दिला जाईल. धूळ आणि वायूप्रदूषण रोखण्यास प्रयत्न केले जातील.

- डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, आयुक्त, नाशिक मनपा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com