नवी दिल्ली । वृत्तसंस्था

करोनावरील लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलें एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. मास्क लावणे आणि हात धुणे हे आपल्यासाठी सर्वाधिक गरजेचे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणे हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे. लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल हे येणार्या काळातच निश्चित होईल.

त्यामुळे मास्क लावणे तर सर्वात सोपे आहे. म्हणून मास्क लावणे आणि हाताच्या स्वच्छतेवर लक्ष देणे हे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. जर समजा लस आलीच नसती तरी आपल्याला हे करणें गरजेचेंच होतें. त्मामुळे स्वतःच्मा आणि दुसर्मांच्मा सुरक्षेसाठी मास्क लावामला कधीही विसरु नका.

लसीकरण ऐच्छिक

कोविड 19 प्रतिबंधक लस घेणे हे हितकारक आहे. जरी आधी कोविड 19 चा संसर्ग होऊन गेला असेल तरी ठरावीक मुदतीत या लशीच्या दोन मात्रा घेणे लोकांच्या हिताचे राहील. कोविड 19 लसीची कुणावर सक्ती केली जाणार नाही.

पण लस घेतलेले केव्हाही चांगले असेल. ती अर्धवट मात्रेत घेऊ नये तर पूर्ण दोन मात्रा घेतल्या जाव्यात. त्यामुळे त्या व्यक्तीचे करोनापासून संरक्षण होईल व इतरांनाही त्याची बाधा होणार नाही. कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, सहकर्मचारी यांना संरक्षण मिळेल, असें आरोग्य मंत्रालयानें म्हटलें आहे.