Monday, April 29, 2024
Homeमनोरंजनकाय आहे महेश मांजरेकरच्या चित्रपट ‘...कोन नाय कोन्चा’चा वाद

काय आहे महेश मांजरेकरच्या चित्रपट ‘…कोन नाय कोन्चा’चा वाद

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) ‘बिग बॉस मराठी’मधून फ्री झाल्यानंतर त्यांच्या नवीन चित्रपटासोबत भेटीला येत आहेत. त्यांचा ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Nay Varanbhat Loncha Kon Nay Koncha) हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला जात आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रीय महिला अयोगाने आक्षेप घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

- Advertisement -

नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट शुक्रवार १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्यातील भडक दृश्यांची चर्चा झाली होती. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली होती. त्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.

महेश मांजरेकर ठाम

चित्रपटावर आक्षेप घेतला जात असतांना महेश मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे, “नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’’ वर होऊन जाऊ दे राडा. कारण 14 जानेवारीला सुरु होणार लांडग्यांचा हैदोस, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात’’.

गिरणी कामगारांची जगण्याची धडपड!

गिरणी कामगारांच्या संपानंतर जगण्यासाठीची धडपड, हार न मानण्याचा मराठी बाणा, त्या वेळेचं ज्वलंत चित्र आणि ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या धारदार लेखनशैलीद्वारे कथेमध्ये निर्माण झालेल्या हृदयभेदी नाट्यानं मांजरेकरांना आकर्षित केलं होतं. त्यातून ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाची निर्मीती झाली.

अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या ‘एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे. ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ ला हितेश मोडक यांनी संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करण बी. रावत यांनी केली आहे.

श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या