
धुळे । Dhule प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) बेताल वक्तव्य करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) आज तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यपाल हटावसाठी (Remove the governor) स्वाक्षरी मोहीम (signature campaign) देखील राबविण्यात आली.
शहरातील जुन्या महापालिकेजवळ शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा वेळोवेळी अपमान राज्यपालांकडून होत आहे. तसेच भाजपाचे प्रवक्ते तसेच इतर पदाधिकारी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वाक्य बोलत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चीड व नाराजी निर्माण झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोषारी छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करतात. भावना दुखवत आहेत. यामुळे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत शिवप्रेमी, जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी, तृतीयपंथी आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
यावेळी रणजीत भोसले, गोरख शर्मा, रईस शेख, मंगेश जगताप, गड्या पहेलवान, जिद्या पहेलवान, संजय माळी, राजेंद्र सोलंकी, उमेश महाले, रईस काझी, दत्तू पाटील, दीपक देवरे, राजेंद्र चितोडकर, जगन ताकटे, राजेंद्र चौधरी, एजाज शेख, सोनू घारू, जितू पाटील, मयूर देवरे, गोलू नगमाल, सागर चौगुले, नजीर शेख, निलेश चौधरी, वाल्मिक मराठे, रामेश्वर साबरे, श्रुतिक पोळ, डॉमनिक मलबारी, हाजी साहब, बरकत शाह, समद शेख, अजहर पठाण, पीर मोहम्मद, हाशिम कुरेशी, असलम खाटीक, निखिल मोमया, सरोज कदम, तरुणा पाटील, संगीता खैरनार, वंदना केदार, निर्मला शिंदे, किरण सूर्यवंशी, माधुरी निकम, वर्षा सूर्यवंशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.