Thursday, April 25, 2024
Homeजळगावसंजय पवारांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे आता बंद..

संजय पवारांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे आता बंद..

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात भाजप व शिंदेगट शिवसेना (BJP and Shindegat Shiv Sena) विरुध्द महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चुरशीची ठरत असलेल्या दुध संघाच्या निवडणुकीत (election of Dudh Sangh) गेल्या काही दिवसांपासून भाजप व शिंदे गटाच्या पॅनलसोबत (panel of BJP and Shinde group)असणारे राष्ट्रवादीचे नेते संजय पवार (NCP leader Sanjay Pawar) यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अजित पवार (Leader of NCP Ajit Pawar) यांनी सांगितल्याप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Congress) दरवाजे बंद (doors are closed) झाल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

- Advertisement -

जळगावच्या दूध संघाच्या निवडणूकीत अशा रंगतील लढती

जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी दोन्ही गटांमध्ये समन्वयासाठी भूमिका निभावली. त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांसोबत चर्चा करून नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी देखील चर्चा केली. आज दुपारपर्यंत ते युतीच्या नेत्यांसोबत बसले होते. दुपारी मात्र ते महाविकास आघाडीकडे आले. या सर्व घडामोडींमध्ये निवडणूक बिनविरोध होण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरलेत. यामुळे आता एकीकडे मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील तर दुसरीकडे आमदार एकनाथ खडसे असा तगडा मुकाबला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपा शिंदे गटाचा आ. खडसेंना धक्का

अजित पवारांचा फोन अन् संजय पवार खडसेंकडे

दरम्यान, आज दुपारी संजय पवार यांना राष्ट्रवादीचे नेते ना. अजित पवार यांचा फोन आला. त्यांनी आ. खडसेंना भेटण्यास सांगितले. त्यानुसार संजय पवार हे दुपारी महाविकास आघाडीकडे आले. एकनाथराव खडसे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेच यावेळी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी दुसरीकडे जायला नको पाहिजे होते असे सांगत याला नकार दिला. यामुळे आता संजय पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दरवाजे बंद झाले असल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

या मुली कोणा ‘आफताब’च्या जाळ्यात तर नाही ?दूध संघाच्या निवडणूकीसाठी अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत

पवारांचा खडसेंवर पलटवार

एकनाथराव खडसे यांनी संजय पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद असल्याचे सांगितल्यानंतर संजय पवार यांनीही प्रत्युत्तर देत खडसेंवर पलटवार केला. या निवडणुकीत मी चिन्हाचा विरोधात प्रचार केला नाही तर माझे दरवाचे का बंद होतील? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. ज्या नाथाभाऊंचे दरवाजे भाजपाने बंद केले होते, त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने उघडले. त्यांच्यासाठी शरद पवार यांची भेट घेवून पाय पडून खडसे यांना घ्यावे अशी विनंती केल्याचेही संजय पवार म्हणाले. माझ्या खीमा केला तरी आम्ही कधीच शरद पवार यांना सोडणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. मी पळणारा पवार नाही, त्यांनी मला जाचक अटीशर्ती टाकल्या होत्या त्या मी अजित पवार यांना सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या