Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआव्हाडांवरील कारवाई सूडबुद्धीने; पोलिसांच्या भूमिकेवर जयंत पाटलांचा सवाल

आव्हाडांवरील कारवाई सूडबुद्धीने; पोलिसांच्या भूमिकेवर जयंत पाटलांचा सवाल

ठाणे | Thane

राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा (Resignation) देण्याचा निर्णय घेतला. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर त्यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) स्वत: तातडीने सांगलीहून (Sangli) ठाण्याला आले. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे…

- Advertisement -

यावेळी जयंत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांचा एका कार्यक्रमातला जुना व्हिडीओ सादर केला आहे. संबंधित कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेचा उल्लेख ‘बहीण’असा करताना दिसत आहेत. संबंधित महिलेचा ‘हमारी बहन मुंबईसे आती है’असा उल्लेख आव्हाडांनी केला आहे. हा व्हिडीओ जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत सादर केला आहे.

त्यानंतर जयंत पाटलांनी राज्य सरकारला काल झालेली घटना ही ३५४ मध्ये कुठे बसते हे दाखवून द्या, असा सवाल विचारला. तसेच महाराष्ट्र पोलीस (Police) आणि ठाणे पोलिसांनी हे प्रकरण या गुन्ह्यात कसं बसवलं. कायद्याची मोडतोड कशी होते. गृहमंत्र्यांनी नेमकं काय सुरू आहे, ते बघावं. मुख्यमंत्री गाडीत असताना, पोलीस अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त असताना विनयभंग कसा होईल? मनात राग ठेऊन सरकारने ही कृती केली. त्या महिलेने मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. त्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. यावरुन मुख्यमंत्री विरुद्ध जितेंद्र आव्हाड असे चित्र निर्माण होत असल्याचे पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, सरकार आणि पोलिसांनी केलेल्या कृतीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आव्हाड राजीनामा घेऊन शरद पवार यांच्याकडे निघाले होते, मात्र तो राजीनामा मी माझ्याकडे घेतला आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा झाली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या