राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सरकारला थेट आव्हान; म्हणाले...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सरकारला थेट आव्हान; म्हणाले...

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

ठाण्यात पत्रकाराला धमकविण्यात येते. रोशनी शिंदे या महिलेला विरोधात बोलली म्हणून मारहाण करण्यात येते. महाराष्ट्रात अशा प्रकारचा हिंसाचार कधी झाला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी २४ तासाच्या आत ठाण्यातील एका तरी पोलीस अधिका-याची बदली करून दाखवावी तरच ठाणे शहरातील पोलीस दबावाखाली वागत नाहीत यावर विश्वास ठेवू असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंगळवारी दिले.

काही लोकांचा राष्ट्रवादीवर आरोप केल्या शिवाय दिवस जात नाही. संभाजीनगरमधील दंगलीआधीचे सीसीटीव्ही तपासून कोण स्कूटरवर फिरत होते याची माहिती पुढे आणली तर खासदार अनिल बोंडे यांना अवघड जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती पाटील यांनी पत्रकारांना दिली. त्यावेळी त्यांनी ठाण्यात घडलेल्या घटनांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सरकारला थेट आव्हान; म्हणाले...
IPLवर कोरोनाचे सावट; 'या' दिग्गजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

ठाण्यात एका पत्रकाराला धमकावण्यात आले. ही माहिती रोशनी शिंदे यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे त्यांना मारहाण झाली, ती महिला गर्भवती आहे. महाराष्ट्रात असा हिंसाचार कधी झाला नाही. या सरकारला विरोधात बोलले पटत नाही. या घटनेचा निषेध करतानाच मारहाण करणाऱ्या महिलांना तत्काळ अटक करा, पत्रकार आणि रोशनी शिंदे यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी जयंत पाटीलयांनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

वैभव कदम नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. याच्या खोलात जायला हवे. त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्रास दिला जात होता. जुन्या प्रकरणात दबाव आणला जात होता. दबाव का आणला? मानसिक छळ का गेला? कारण जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बोलल्यानंतर आव्हाड यांना अटक करता येईल, यासाठी ठाणे पोलीस यामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रकरणात ठाण्याचे आयुक्त काय करतात, याचा खुलासा झाला पाहिजे असेही पाटील म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com