कोरेगाव-भीमा प्रकरणात पवारांचे महत्वाचे खुलासे

कोरेगाव-भीमा प्रकरणात पवारांचे महत्वाचे खुलासे
शरद पवार

मुंबई | Mumbai

२०१८ साली घडलेल्या कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक गंभीर आरोप केले होते.

या पार्श्वभूमीवर पवार यांची आज या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल आणि सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं आहे.

शरद पवार यांनी आपल्या जबाबात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला असून कोरेगाव -भीमा हिंसाचारावेळी पोलिसांनी योग्यवेळी कारवाई न करता दुर्लक्ष केले त्यामुळे हिंसाचार भडकला असा दावा त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी योग्यवेळी काळजी घ्यायला हवी होती, असेही पवारांनी स्पष्ट केले. हिंसाचाराच्या घटनेबाबत आपल्या माध्यमांतून समजल्याचे सांगत पवारांनी कुणावरही वैयक्तिक किंवा राजकीय आरोप मला करायचे नाहीत, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.