सत्तेच्या गैरवापरातून मुलभूत अधिकारावर गंडांतर - खा.शरद पवार

पुरंदरेंचा शिवजयंती तारखांबाबत माफिनामा ; वीजेचा प्रश्‍नाबाबत केंद्राकडे बोट
सत्तेच्या गैरवापरातून मुलभूत अधिकारावर गंडांतर - खा.शरद पवार

जळगाव - jalgaon

सत्तेचा गैरवापर कसे करतात हे विरोधकांच्या विधानातून दिसून येते. केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांचे हे विधान आहे. अलीकडे एक नवीन पध्दत सुरू झाली, जे प्रत्यक्ष सत्तेत नाही प्रशासनात नाही, त्यांनी काही तरी भूमिका घ्यायची आणि यंत्रणेने कारवाई करायची हे सरळ सरळ मुलभूत अधिकारावर गंडातर आणण्याचे काम असल्याचा आरोप (mp Sharad Pawar) खा.शरद पवार यांनी आज येथे केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष (President of the NCP) खा. शरद पवार हे आज (jalgaon) जळगाव दौर्‍यावर होते. या दौर्‍यात जैन हिल्स येथे खा. पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. खा.पवार पुढे म्हणाले की, भुजबळ, पिचड, गुजराथी, तटकरे ही सगळी नाव समाजातील सर्व घटकांना घेऊन जाणारी. पक्षाची निती एका जातीभोवती सिमीत आहे असे काही दर्शवत नाही. त्यांच्याकडे दुसरं बोलायला काही नाही म्हणून ते असे आरोप करीत असल्याचा टोला खा.पवार यांनी लगावला.

अखंड भारत म्हणजे काय नेपाळच्या हद्दीपासून पाकिस्तान, बांग्लादेश हा अखंड भारत आहे. १५ वर्षात अखंड भारत करणे ही आनंदाची गोष्ट आहे. देशात आज त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेच्या जोरावर नवीन कार्यक्रम घ्यायचा त्यांनी ठरविले असल्याचा टोला खा.पवार यांनी मोहन भागवतांना लगावला.

वीजेचा प्रश्‍नावरून केंद्रावर निशाणा

गुजरात, मप्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र या राज्यांची, संबंध देशात वीज टंचाई, भाजपाशासित राज्यातही टंचाई, त्याची कारणे कोळसाशी संबंधित आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहे. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री या प्रश्‍नाकडे गांभीर्याने बघत असून कालच झालेल्या बैठकीत नवीन पर्याय काही देता येईल का यासाठी काही अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपविली आहे. तीन दिवसात या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना सांगितले जाईल.

वीजेचा प्रश्न राष्ट्रीय झाला असुन महाराष्ट्रातील राज्यकर्ते याबाबत गंभीर असल्याचे खा. पवार म्हणाले.

पुरंदरेंचा शिवजयंती तारखेवरून माफिनामा

जेम्स लेन- पुरंदरे वादासंदर्भात खा.शरद पवार यांनी थेट पुरंदरेंनी लेनला लिहीलेले पत्रच पत्रकार परिषदेत दाखविले. खा.पवार म्हणाले की, जेम्स लेनने लिहीलेल्या वादग्रस्त पुस्तकाच्या लिखाणावरून सोलापूरातील भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांनी त्याचे कौतुक करीत चांगला शिव अभ्यासक आहे, असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्याच्यानंतर लोकांमध्ये चीड निर्माण झाली. त्यानंतर पुरंदरेंनी आणखी एक प्रश्‍न उपस्थित केला तो म्हणजे शिवजयंती केव्हा साजरी करावी? ही शिवजयंती जन्मतिथीने करावी की इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे करावी? त्यावर त्यांनी काही विधाने केली.

शेवटी ५ फेब्रुवारी २००१ ला स्वहस्ताक्षरात पत्र दिले की शिवजयंतीची तारीख शासनाला कळविली आणि साळगावकरांना तिथीप्रमाणे करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. शिवभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला म्हणून पुरंदरेंनी माङ्गि मागितल्याचे त्यांचे पत्र खा.पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखविले.

सामाजिक ऐक्य बिघडता कामा नये

राज्यात मनसेकडुन अजान विरूध्द हनुमान चालीसा असे वातावरण निर्माण केले जात आहे. या प्रश्‍नासंदर्भात बोलतांना खा. शरद पवार यांनी सांगितले की, आमची भूमिका लोक ठरवितात. जे असे प्रश्‍न निर्माण करीत आहे त्यांच्याविषयी लोकांनी मागील निवडणुकीत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र कुठल्याही परिस्थीतीत सामाजिक ऐक्य बिघडु नये ही आमची इच्छा असल्याचे खा.पवार म्हणाले.

मुस्लीम तुष्टीकरणाच्या मुद्द्यावरून खा.पवार यांनी सांगितले की, मी केंद्रात संरक्षण मंत्री असतांना राज्यात ११ ठिकाणी बॉम्बस्ङ्गोट झाले. त्यावेळी मी एका मुस्लीम भागाचा उल्लेख केला होता. त्या बॉम्बस्ङ्गोटात जे साहीत्य वापरले गेले ते आपल्या देशातील नसल्याचे पाहणीवरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे बाहेरील शक्तीचा यात सहभाग असल्याचे त्यावेळी मी म्हणालो होतो. जातीय दंगली घडविण्याची भूमिका विरोधकांची होती मात्र त्यावेळी तसे झाले नाही असेही खा. पवार म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.