Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीच्या आमदाराला टॅक्सी चालकाकडून धमकी; गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या आमदाराला टॅक्सी चालकाकडून धमकी; गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तुमसर मतदार संघातील आमदार राजू कोरमोरे (Raju Kormore) यांना एका टॅक्सी चालकाने धमकावल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक; नाशकातही हजेरी, आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

आमदार राजू कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जात होते. टोलचे पैसे देण्यावरून वाद झाल्याने टॅक्सी चालकाने आमदार राजू कोरमोरे यांना टॅक्सीतून खाली उतरवत धमकावले.

मानव केंद्रित जागतिकीकरण : शेवटच्या घटकापर्यंत जी 20 नेताना कोणालाही मागे राहू देणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोरमोरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

काँग्रेसची गुरुवारी राज्यभर पदयात्रा

- Advertisment -

ताज्या बातम्या