... तर लवकरच राज्यात वेगळे चित्र दिसेल - जयंत पाटील

... तर लवकरच राज्यात वेगळे चित्र दिसेल - जयंत पाटील

मुंबई | Mumbai

शिवसेनेत (Shivsena) फुट पडल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) यांनी शिवसेना फुटल्यानंतर बाहेर पडलेल्यांना पश्चाताप होत असून ते पुनर्विचार करत असल्याचा दावा केला आहे...

ते म्हणाले की, पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाही. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार (MLA) पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात राज्यात चित्र वेगळे दिसेल असे पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com