धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

मुंबई | Mumbai

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाचे (Parli Constituency) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे...

यासंदर्भात स्वत: धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा (Driver) वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. त्यामध्ये माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या अपघातानंतर धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी ( Treatment) मुंबईला (Mumbai) हलविण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com