Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याअनिल देशमुखांना जामीन मंजूर

अनिल देशमुखांना जामीन मंजूर

मुंबई | Mumbai

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तब्बल ११ महिन्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे…

- Advertisement -

अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जमीन मंजूर केला आहे. तसेच हा जामीन मंजूर करतांना न्यायालयाने काही अटी शर्ती देखील घातल्या आहेत.

मागील वर्षी २ नोव्हेंबर रोजी ईडीने (ED) त्यांना अटक केली होती. तेव्हापासून ते ‘ईडी’ च्या कोठडीत होते. त्यानंतर ईडी आणि सीबीआयने (CBI) देशमुखांच्या मालमत्तेवर छापे (Raid) टाकले होते.

यादरम्यान देशमुखांनी जामीनासाठी प्रयत्नही केला होता, पंरतु त्यांना जामीन मिळू शकला नव्हता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुखांना जामीन मिळाला असला तरी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे देशमुख अजूनही कोठडीतच (Custody) राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या