Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याविधानपरिषद निवडणुकीत २१ कोटींना एका पक्षाची ३ मतं फुटली; 'या' आमदाराचा गौप्यस्फोट

विधानपरिषद निवडणुकीत २१ कोटींना एका पक्षाची ३ मतं फुटली; ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई । Mumbai

महिनाभरापूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) विजयाचा झेंडा फडकवला. महाविकास आघाडी सरकारचा (MahaVikas Aghadi Government) बालेकील्ला असतानाही दवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली भाजपने सरशी केली. तसेच या निवडणुकीवेळी आमदारांच्या फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे (NCP) विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे…

- Advertisement -

यावेळी मिटकरी म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीत एका पक्षाची तीन मतं प्रत्येकी ७ कोटी रुपये देऊन फोडण्यात आले असून त्यासाठी २१ कोटी खर्च करण्यात आले. या पैशांची गोळाबेरीज केली तर २७ मतांसाठी १६१ कोटी रुपये होतात. आपल्या जमिनीची किंमत पाच लाख आहे. चार एकर विकली तरी २० लाख येतील असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, आम्हाला आताही ऑफर आहे, या गटाचे अध्यक्ष व्हा, एक मर्सिडीज घ्या, २ लाख रुपये महिना घ्या आणि २ कोटी नगदी घ्या. सध्याच्या श्रीमंत निवडणुकीत विधान परिषदेसारख्या सभागृहात मला एकही रुपया खर्च न करता आमदार होता आले ते केवळ अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळेच शक्य झाले असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या