नवी दिल्ली

राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने आज दिल्लीत बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असणार आहे. तर शिवसेना नेते संजय राऊतही पवारांची भेट घेणार आहेत.

या पत्रानंतर भाजपाकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, राज्यात अचानक निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत.

संजय राऊत पवारांना भेटणार

महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतही दिल्लीत जाणार असून, शरद पवार यांची भेट घेणार आहे. या बैठकीत अनिल देशमुख यांच्याबाबत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान मुंबईचे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांच्या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे . अशा प्रकारचे आरोप होत आहेत हे दुर्दैवी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.