Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra News : सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल रमेश बैस यांची भेट;...

Maharashtra News : सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल रमेश बैस यांची भेट; कारण काय?

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील (Jalna District) आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आमरण उपोषण करत आहेत. दुसरीकडे मात्र आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच आता मराठा आरक्षणासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) पुढाकार घेतला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण; खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) या राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची भेट घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालून हे प्रकरण सोडवावे, अशी मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार चांगलेच कात्रीत सापडण्याची शक्यता आहे.

नांदगाव तालुक्यात मोठी कारवाई; देहव्रिक्री रॅकेटचा पर्दाफाश

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या या आवाहनाला मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी आमदार खासदारांच्या (MLA And MP) गाड्या अडवल्या जात असून त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारले जात आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारत लगावणार विजयी षटकार? कुणाचे पारडे जड?

- Advertisment -

ताज्या बातम्या