Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार, राजेश टोपे उद्या नाशकात

शरद पवार, राजेश टोपे उद्या नाशकात

नाशिक। प्रतिनिधी

राज्यभरातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे समन्वयक शरद पवार व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे शुक्रवारी (दि.२४) नाशिक दौर्‍यावर अाहेत.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाचा आढावा, आरोग्य यंत्रणेचे काम याची माहिती घेणार आहेत. दरम्यान नाशिक लाॅकडाऊन या बाबत ते काही सुचना करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभर दौर्‍यानंतर आता खा.शरद पवार देखील मैदानात उतरले आहे. त्यांच्या सोबतीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत. शरद पवार सकाळी मुंबईहून वाहनाने नाशिककडे प्रयाण करतील.

दुपारी एक वाजता ते नाशिकमध्ये पोहचतील व हाॅटेल एमराॅल्ड पार्क येथे उतरतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यलयात बैठकिसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचतील. यावेळी राजेश टोपे देखील असतील.

बैठकीत ते नाशिक शहर व जिल्हातील करोना परिस्थितीचा आढावा घेतील.यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे व इतर अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी चारनंतर ते अौरंगाबादला प्रयाण करतील.

दरम्यान शरद पवार व आरोग्य मंत्री येणार असल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीच्या नियोजनाची धावपळ सुरु होती. या आठवडयात मुख्यमंत्री ठाकरे नाशिकमध्ये येतील व लाॅकडाऊनचा निर्णय घेतील असे बोलले जात होते.

पण ठाकरेंऐवजी पवार व टोपे नाशकात येत आहे. शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हे दोन्ही नेते लाॅकडाऊनबाबत काही सूचना करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या