Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही...

राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही…

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत अस्वस्थता आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना दुसऱ्या दिवशी वेग आला आहे…

- Advertisement -

एकीकडे शरद पवार राजीनामा मागे घेणार का? यावर चर्चा होत असताना दुसरीकडे त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) पुढचा अध्यक्ष कोण होणार? यावर जोरदार चर्चा घडताना पाहायला मिळत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल अशा अनेक नावांची चर्चा होत आहे. सुप्रिया सुळेच राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्ष होतील अशी शक्यता व्यक्त होत असताना त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठं विधान केले आहे.

Cabinet Decisions : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, शिंदे-फडणवीस सरकारने काय ठरवलं? वाचा…

अंदाज लावू नका, एक दिवस जाऊ द्या, निर्णय आम्हीच तुम्हाला सांगू. आज शरद पवार आले सगळे नेते त्यांना भेटले. मुंबईत असताना पवारसाहेब आले नेहमीप्रमाणेच भेट घेतली. आज कोणतीही बैठक नव्हती. कोणताही नेता बैठकीला आला नव्हता. आज बैठक झाली नाही निर्णय झालेला नाही. उलट सुलट बातम्या येत होत्या. पवारसाहेबांनी काल घेतलेला निर्णय परत घेण्याचा विचार केलेला नाही. ते म्हणाले विचार करु द्या. त्यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट केलेले नाही, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, मला…

दरम्यान, आज सकाळपासूनच सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा चालू आहे. मात्र, हे सर्व तर्क असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. “सुप्रिया सुळेंबाबतची चर्चा फक्त तर्कांच्या आधारे केली जात आहे. कुणी काही विधान दिलं की त्यावर सगळ्यांनी ब्रेकिंग न्यूज चालवली. हे चुकीचं आहे. पक्षाची अधिकृत व्यक्ती म्हणून मी सांगू शकतो की ना पक्षाची कोणती बैठक झालेली आहे ना कोणता निर्णय झालेला आहे. बैठक होईल, तेव्हा मीच तु्म्हाला सांगेन”, असं प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या