ईडीच्या छापेमारीवर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल (Kagal) आणि पुण्यातील (Pune) घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED)आज सकाळी छापे (Raid) टाकले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर आता यावर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे...

यावेळी ते म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरांवर आणि माझ्या नातेवाईकांच्या घरांवर (Houses) ईडीची छापेमारी सुरू आहे. माझ्या मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली. मी काही कामानिमित्त बाहेर आहे, त्यामुळे मला ही सर्व माहिती फोनवरूनच मिळाली. तसेच मी प्रसारमाध्यमांद्वारे असे ऐकत आहे की, माझ्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे. परंतु. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शांत राहावे. कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना (Activists) केले आहे.

तर दुसरीकडे मुश्रीफ यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप करत म्हटले की, दीड वर्षांपूर्वीच ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. तेव्हा हाती काहीच लागले नाही? मग आता पुन्हा माझ्यावर कारवाई कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपचे कागल तालुक्यातील एक नेते माझ्यावर कारवाई व्हावी यासाठी वारंवार दिल्लीला चकरा मारत होते. त्यांचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांना उघडपणे सांगत होते की आता मुश्रीफांवर कारवाई होणार आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. हे सर्व गलीच्छ राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com