Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसेंचे टार्गेट काय? नाशकात जंगी स्वागत; पाहा संपूर्ण पत्रकार परिषद

राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसेंचे टार्गेट काय? नाशकात जंगी स्वागत; पाहा संपूर्ण पत्रकार परिषद

नाशिक | प्रतिनिधी

भाजपमधे पक्ष वाढवणाऱ्या बहुजन नेत्यांकडे मोठे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत आल्यानंतर प्रथम टार्गेट जिल्हा परिषदा, नगरपालिका आहेत. ज्याठिकाणी गट तयार आहेत त्या जिल्हा परिषदा व नगरपालिका आधी ताब्यात घ्यायच्या आहेत. यानंतर पुढील दिशा ठरेल. आता टेन्शन घेणार नाही तर टेन्शन देणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. ..

- Advertisement -

ते नाशकात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आता टेन्शन घेण्याचे दिवस गेले आहेत. भाजपत ज्या नेत्यांनी पक्ष वाढवला त्याच बहुजन नेत्यांकडे दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे वेळीच पक्षाच्या बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला.

ते म्हणाले, जळगाव तसेच उत्तर महारष्ट्रातील जिल्हा परिषदा, नगरपालिका जेथे गट करणे शक्य आहे त्या राष्ट्रवादी पक्षाकडे आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

नाशिकमध्ये नवीन नाशिकसह सातपूर, परिसरात लेवा पाटील समूह मोठा आहे. याठिकाणी खडसे यांचे मोठे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खडसे जळगावी परतत असताना ते नाशकात आज थांबले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औन्क्षण करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खडसे यांचे जंगी स्वागत नाशकात केले.

गोल्फ क्लब मैदानानजीक शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे फडणवीस यांना करोना झाल्याची बातमी त्यांच्या कानावर गेल्यानंतर फडणवीस लवकर करोना मुक्त व्हावेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा! अशा शब्दांत फडणवीस यांच्यावरील प्रश्नाला बगल दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या