करोनाचा उद्रेक : अजित पवारानंतर राष्ट्रवादीचा 'हा' बडा नेता पॉझिटिव्ह

करोनाचा उद्रेक : अजित पवारानंतर राष्ट्रवादीचा 'हा' बडा नेता पॉझिटिव्ह

मुंबई । Mumbai

राज्यात एकीकडे करोनाचे (corona) रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे नेतेमंडळीही करोनाच्या विळख्यात सापडतांना दिसत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता त्या पाठोपाठ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना देखील करोनाची (Corona) लागण झाली आहे. छगन भुजबळ यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे...

छगन भुजबळ यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने करोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. तसेच लक्षणे दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.” असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देखील करोनाची लागण झाली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com