सत्ताधाऱ्यांच्या दबावाच्या राजकारणाला घाबरणार नाही - भुजबळ

सत्ताधाऱ्यांच्या दबावाच्या राजकारणाला घाबरणार नाही - भुजबळ

नवी दिल्ली | New Delhi

सत्ताधाऱ्यांकडून रोज कोणावर ना कोणावर ईडी (ED) सीबीआय (CBI) आयकर विभाग (Income Tax) यांच्या धाडी (Raid) टाकल्या जात आहेत. अशाप्रकारे धाडी टाकून आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना शांत बसवण्याचे काम सध्या देशात सुरू आहे.

मात्र ज्या लोकांवर धाड पडते त्यापैकी कोणी भाजपमध्ये प्रवेश केला तर तो स्वच्छ होतो. पंरतु आम्ही मात्र अशा दबावाच्या राजकारणाला घाबरणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे....

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर (Talkatora Stadium) आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) ८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाप्रसंगी भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, देशात सध्या भितीचे वातावरण आहे.या भीतीच्या वातावरणाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व लोक तयार असून ते सर्वजण पवार साहेबांकडे (Sharad Pawar) आशेने पाहत आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, ज्यावेळी केंद्रातील हे सरकार सत्तेत आले त्यावेळी अनेक आश्वासने या जनतेला त्यांनी दिली होती. मात्र यापैकी एकही आश्वासन यांना पाळता आले नाही. आज प्रत्येक घटकाचे शेतकरी असेल कामगार असेल किंवा छोटा व्यवसाय असेल हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. असे असूनही केंद्राकडून कोणतीही मदत दिली जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, देशातील महागाई (Inflation) वाढली असून सर्व सीमा ओलांडून महागाई पुढे गेली आहे. आम्ही कधीही ज्या गोष्टींवर टॅक्स लावला नाही त्या गोष्टींवर हे सरकार जीएसटी (GST) लावत आहे. अन्नधान्य, दूध, दही, ताक यावर सुध्दा जीएसटी लावला जात आहे. कुणी रुग्णालयामध्ये ऍडमिट झाले तर त्याला देखील जीएसटी द्यावा लागतो अशी परिस्थिती देशात आहे. एव्हढेच नाही तर मुलांच्या शिक्षणावर देखील जीएसटी लावला जात असून ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com