Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना करोनाची लागण

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना करोनाची लागण

नाशिक | Nashik

राज्यात पुन्हा एकदा दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण (Corona Patient) वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते आपल्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत…

- Advertisement -

पाण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

याबाबत अधिक माहिती अशी की, काल भुजबळ येवला दौऱ्यावर (Yeola) होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने येवल्याहून त्यांना नाशिकमध्ये (Nashik) आणण्यात आले. त्यानंतर अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. त्या रिपोर्टमध्ये करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच यासंदर्भात भुजबळांनी ट्वीट केले असून त्यात म्हटले की, माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास आपली करोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा.” असे ते म्हणाले आहेत.

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू

दरम्यान, यापूर्वी देखील करोनाच्या दुसऱ्या लाटेत भुजबळांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना करोनाची लागण (Corona infection) झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या