... हे तर आव्हाडांविरोधात षड्यंत्र - अजित पवार

अजित पवार
अजित पवार

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध विनयभंगांचा (Molestation) गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा (Resignation) देण्याची घोषणा केली आहे. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्याविरोधात षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली आहे...

ते म्हणाले की, कायदे आपण कुणावर अन्याय होऊ नये म्हणून करत असतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस दबावाखाली वागत आहेत. सरकार बदलेले आहे. विरोधकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला असताना कुणीही याबाबत काहीच का बोलत नाही असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना दैवत मानतात. त्यांनी राजीनामा द्यावा का याबाबत शरद पवार यांचा शेवटचा निर्णय असेल. तोच निर्णय जितेंद्र आव्हाड मान्य करतील, त्यांना पटो किंवा नको, साहेबांचा शब्द म्हणून ते मान्य करतील, अशी रोखठोक भूमिका पवार यांनी मांडली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com