अजित पवारांनी ‘नॉट रिचेबल’च्या वृत्तावर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे कालपासून पक्षातील ७ आमदारांसह ‘नॉट रिचेबल’ असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यामुळे अजित पवार ‘नॉट रिचेबल’च्या वृत्ताने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशातच आज (दि.९) रोजी अजित पवारांनी माध्यमांसमोर येत नॉट रिचेबलच्या वृत्तावर भाष्य केले आहे…

यावेळी अजित पवार म्हणाले की, काल काम करत असताना मला पित्ताचा त्रास (Biliousness) होऊ लागला. जागरणं आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधे (Medicines) घेतली आणि झोपलो. आज बरे वाटू लागल्यानंतर सकाळपासून मी कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमे कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होतं, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने तुम्हाला अधिकार आहे, परंतु आम्ही माणूसचं आहोत. माझी सर्वांना विनंती आहे की, हे बरोबर नाही. वृत्तपत्रात (NewsPaper) देखील अशाच बातम्या होत्या ते पाहून मला वाईट वाटले. तसेच एखाद्या व्यक्तीची बातमी दाखवताना सर्वात आधी पुष्टी केली पाहिजे. कारण नसताना एखाद्याची बदनामी करू नका,अशी विनंती अजित पवारांनी यावेळी केली

दरम्यान, काल अजित पवार यांचे पुण्यात (Pune) नियोजित तीन कार्यक्रम होते. पण अचानकपणे दुपारी दोन वाजता त्यांनी तिन्ही कार्यक्रम रद्द केले होते. त्यावेळी कार्यक्रम (Program) रद्द करण्याचे कारण समजू शकले नव्हते. त्यानंतर आजचे आठ कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, आज सकाळीच त्यांनी नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केल्याने ‘नॉट रिचेबल’ असल्याचे वृत्त खोटे ठरवले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *