अजित पवारांकडून कृषिमंत्री सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी; काय आहे प्रकरण?

अजित पवारांकडून कृषिमंत्री सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी; काय आहे प्रकरण?

नागपूर | Nagpur

हिवाळी अधिवेशनाचा (winter session) दुसरा आठवडा आजपासून सुरु झाला असून विरोधकांनी शिंदे- फडणवीस सरकारला (Shinde- Fadnavis Government) विविध मुद्द्यांवरून चांगलेच धारेवर धरले आहे.

मागील आठवड्यात दिशा सालियन प्रकरणावरून ( Disha Salian case) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) घेरले होते. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ( Ajit Pawar) राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवारून गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे..

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात (Sillod Constituency) होत असलेल्या 'सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप करत कृषी महोत्सवाच्या नावाने तिकीट छापण्यात आल्याचे पवारांनी म्हटले आहे.

यावेळी पवार म्हणाले की, ज्या जिल्ह्यात १० पेक्षा अधिक तालुके आहेत, त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली असून त्यासाठी २५ हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. तर इतर प्रवेशिकांचे पाच हजार, साडेसात हजार आणि दहा हजार दर ठरवण्यात आले असून याचे माझाकडे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, सध्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे तत्कालीन सरकारमध्ये राज्यमंत्री असतांना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील (Washim District) १५० कोटींच्या ३७ एकर गायरान जमिनीचा घोटाळा (Gayran land scam) केला असून ही गायरान जमीन सत्तार यांनी एका व्यक्तीला विकल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी पवारांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com